पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

✍कामाची लाज वाटणारा तरूण

  कामाची लाज वाटणं हा तरुण मुलामुलींचा पहिला दोष. इच्छाशक्ती कमी आणि मेहनतीचा कंटाळा हा दुसरा मोठा दोष आहे. सगळ्यांना भरपूर पॅकेज देणारं, बिनकष्टाचं करिअर हवंय. सगळे गर्दीत, इंजिनिअरिंगच्या रांगेत उभे. का उभे? तर तिथं सगळेच जातात म्हणून आपणही जायचं. नवीन काही सुचत नाही, कुठल्याच विषयाची पुरेशी माहिती नाही, अभ्यास नाही, वाचन नाही, इंग्रजीची भीती वाटतेच आणि मराठीत धड काही बोलता येत नाही. आपण जे शिकतो, त्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या माणसांची नावं सांगता येत नाही. भविष्यातल्या बदलांचा अंदाज तर शून्यच. परिणाम काय? नैराश्य, हताशा आणि पैशाचा चक्काचूर. दरवर्षी साधारणपणे मार्च महिन्यात आमचा करिअर काऊन्सेलिंगचा हंगाम सुरू होतो. यावर्षीही झाला. मी यावर्षी जवळपास एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना भेटलो आणि त्यांच्या पालकांशीदेखील मी चर्चा केली. आपल्या मुलांनी संधी असूनसुद्धा अनेक गोष्टी पाहिलेल्या किंवा ऐकलेल्यासुद्धा नाहीत, असा मला अनुभव आला. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आपण साध्या साध्या माहितीपासूनसुद्धा किती दूर आहोत, याची दुर्दैवी जाणीव झाली.   उदाहरणादाखल मी काही गोष्टी पालकांस...