मुख्य सामग्रीवर वगळा

 


Posts

कविता :- आतुरता

 
Image
_________________________________________ दिनांक :- 22 ऑक्टोंबर 2020 ला मराठीचेे शिलेदार समूहावर  प्रकाशित झालेल्या बेस्ट पाच कविता _______________________________________ आतुरता
 आस लागली दर्शना  दर्शना बा विठ्ठलाची  वारी कार्तिकी समीप  आतुरता पंढरीची  ॥
 मुख दर्शनासी तुझ्या तुझ्या मुकलो रे आम्ही  द्वार उघड विठ्ठला  वाळवंटी ये विश्रामी ॥
 वर्ष सरत आले रे  दु:ख थमता थमेना  तुझ्या दर्शनाविना हे  चित्त कशात लागेना ॥
 तुच कष्ट निवारण्या  धाव भक्तांच्या हाकेला  पंढरीचा राजा तुझा  भक्त दर्शना भुकेला ॥
 आतुरता संपवून  टाक एकदाची सारी  करू दे आम्हां भक्तांना  नित्य नियमाची वारी  ॥
 दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)  उस्मानाबाद ©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह 🌸💐🌸💐🌸
आतुरता मनी दाटली मला माझ्या विद्यार्थ्यांना भेटायची  सांग सांग देवा आता शाळा कधी उघडायची
बे एके बे बे दुणी चार शिकवायचा मला शिष्टाचार  दुःख करायची वजा अन सुखाचा करायचाय गुणाकार  प्रार्थना म्हणायची आम्हाला सगळ्यांच्या सुखशांतीची  सांग सांग देवा आता शाळा कधी उघडायची 
ऑनलाईन ऑफलाईन शिकून मुलं गेली थकून  मोबाईल पाहून पाहून डोळे गेले दिपून  सवय लावायची मला त्यांना अभ्यासाची  सांग स…

बोधकथा :- प्रारब्ध आणि संगत

 
Image
माणसाची ओळख ही त्याच्या संगती वरून ठरते. तुम्ही दोन पोपटाची गोष्ट वाचलीच असेल. एक चोरा जवळ राहतो आणि एक साधू जवळ दोघांच्यात झालेला बदल तुम्हाला माहित आहेच  ! ... खाली असाच एक लेख आहे ... 💐🌸💐 एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, " अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस तर उदया तू माझ्या घरी जेवायला ये."
भुंगा दुस-या दिवशी तडक त्याच्याकडे गेला पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उदया माझ्याकडे ये!..
दुस-याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं. किड्याने परागरस चाखला.किती भाग्यवान मी!...अस म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या देवाच्या चरणांवर अर्पण केलं. किड्याला भगवानाचे दर्शन झालं तो धन्य झाला कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य लाभलं. संध्याकाळी पुजा-यान…

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

 
Image
🌸💐🌸 Plzzzzzzz वाचा रडणार म्हणजे रडणार
माझ्या शहिदजवानांना हीकविता अर्पण..... ___________________________________________
बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झालीय... तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आलीय...
घायाळ जरी झालो तरी  अजूनसुद्धा लढतो आहे आई...इंच इंच जखमा छातीवर घेऊन पत्र शेवटचं लिहतो आहे, पत्र शेवटचं लिहतो आहे...
लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई जशाच्या तश्या आठवतात या बर्फ़ावरती माझ्या डोळ्यातली आसवंसुद्धा गोठवतात खुपदा वाटतं आई तुझ्या कुशीत येऊन निजावं तुझ्या प्रेमाच्या वर्षावात पुन्हा एकदा भिजावं पण मला ठाऊक आहे, असं आता होणार नाही आली वेळ मला सोडून, रित्या हाती जाणार नाही आपलं घर आठवून आई, एकटाच रडतो आहे रडता, रडता आई पत्र शेवटचं लिहतो आहे...
तुमच्यासाठी बाबा... बरंच काही करायचं होतं तुमच्या खांद्यावरच ओझं थोडं माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं पहा ना बाबा ! दैवानं आपला कसा घात केला माझ्या प्रेताचा भार सुद्धा तुमच्याच खांद्यावरती दिला तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून... मारणाआधीच मारतो आहे मरता... मारता बाबा पत्र शेवटचं लिहतो आहे..
तुझ्या सगळ्या आठवणी भैय्या मनात घर करून बसल्या आहेत आत्ताच... चार दोन गोळ्या उजव्या दंडा…

कविता :- शाळा सुरू करा ना गुरुजी

 
Image
एक विद्यार्थी आपल्या गुरुजींना शाळा सुरू करण्याची  विनंती करतो आहे.

बस झालाय आता   या कोरोनाचा चाळा विनंती एकच गुरुजी...🙏.... तुम्ही सुरू करा शाळा

ऑनलाईन शिक्षण डोक्यात नाही शिरत मोबाइलचा अभ्यास काही मनात नाही भरत कृतीयुक्त खेळ तुम्ही आम्हा सोबत खेळा विनंती एकच.....🙏....तुम्ही शाळा सुरु करा।

मायबाप म्हणती हा समय आला कैसा पोट भरण्याइतका बी जवळ नाही पैसा रिचार्ज तुझ्यासाठी कोठून मारु बाळा विनंती एकच.....🙏.....तुम्ही शाळा सुरु करा।

मोबाइल येऊ द्या किती थ्रिजी किंवा फोरजी साऱ्या गावाला आता आठवतात गुरुजी मार्ग यातून तुम्ही कसातरी काढा विनंती एकच....🙏....तुम्ही शाळा सुरु करा।
न्यावी लागतात चारायला रानामाळात  ढोरं गावकरी म्हणती सगळी बिघडून गेली पोरं रंग बी माझा पडला आहे काळा विनंती एकच...🙏.....तुम्ही शाळा सुरु करा।
आनंदाचे दिस होते गेले सारे सरुन आठवण होते शाळेची डोळे येती भरुन स्वप्नामधी येते रोज माझ्या खडू फळा विनंती एकच.....🙏...तुम्ही शाळा सुरु करा।

मैदानातली मजा मस्ती बंद झाली सारी शाळेतल्या जेवणाची बातच लय न्यारी पोषण आहार कर्मचारी लावत होते लळा विनंती एकच....🙏...तुम्ही शाळा सुरु करा।

खरं सांगू गुरुजी तुम्ही शाळेत येता जेव…

कविता :- सावर रे मना

 
Image
आज दिनांक 21 ऑक्टोंबर 2020 ला मराठीचे शिलेदार समूहावर प्रकाशित झालेल्या बेस्ट पाच कविता .... 
🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴

सावर रे मना
    सावर रे मना आता तरी       होवू नकोस दोलायमान       राहशील स्थिरभावाने तू       होशील रे मोठा गुणवान ॥
      तुझा चंचल स्वभाव जणू       वाटे सर्कशीतला जोकर       गांभिर्याने वाग जराशी तू       चंचलपणाला दे ठोकर  ॥
      उठसूठ माजले काहूर       तुझ्या ठायी विचारचक्राचे       सावर रे मना आता तरी       बांध घाल तुला संयमाचे ॥
      नको होवूस चलबिचल       प्रज्ञा तुझी अलौकिकतेची       अभ्यासाने सर्व साध्य होई       दाखव चुणूक विद्वत्तेची  ॥
      सावर रे मना आता तरी       दु:खे ही पचवायला शिक       समतोल ढळू देवू नको       स्पर्धेत जीवनाच्या रे टिक ॥
  दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)   उस्मानाबाद ©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह
💐💐💐
सावर रे मना      आवर भावना      लेखनाचे बळ      वाढो ही प्रेरणा ॥      मुक्त विचारांचा      कल्पना संचार      नकोच आवरू      तयाचा प्रसार ॥      व्यक्त भावनांना      कर अभिव्यक्त      मनाला खंबीर      कर तू सशक्त ॥      सावर रे मना      ठेव आत्मभान      होऊ नकोच रे      …

🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

 
Image
------------------------------------------------------- 🔴 थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – विचार बनाये जिंदगी! -------------------------------------------------------
त्या घटनेला आज एकतीस वर्ष झाले. 
तीन दशकांपासुन बॉलीवुडमध्ये आपलं स्टारपद अढळपणे मिरवणारा आमिर खान तेव्हा आपल्या वयाच्या विशीत होता, त्याचा चुलत काका मन्सुर खान ह्यांनी त्याला हिरो म्हणुन हिंदी सिनेमामध्ये लॉन्च करायचे ठरवले होते, फिल्मचे नाव होते, कयामत से कयामत तक, आणि ती एक लो बजेट फिल्म होती, चित्रपट पुर्ण झाला, पण सिनेमा बनवातानाच संपुर्ण बजेट संपले होते,  सिनेमाची प्रसिद्धी आणि प्रमोशन करण्यासाठी निर्माता-दिग्दर्शक ह्यांच्याकडे पुरेसे पैसेच उरले नाहीत. त्याकाळात तर केबल नेटवर्कही नव्हते, इंटरनेटही नव्हते, त्यामुळे चित्रपटांची प्रसिद्धी मुख्यतः पोस्टरमधुनच व्हायची. अमिर खान नवखा असला, कुमारवयीन असला, आणि पहील्याच सिनेमाचा हिरो असला तरी, लहानपणापासुन ह्या क्षेत्रात वावरल्याने त्याला सिनेमाच्या तंत्राची चांगली जाणीव होती.  कसलाही खर्च न करता, आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी त्याने आपल्या काकाला सांगुन एक शक्कल लढवली,  आपल्या…

बोधकथा :- हस्तश्रमाने राबनार्यांच्या श्रमाचे मोल करा ..!

 
Image
🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴
_________________________________________
"ताई कितीला दिला हा फडा?" " भाऊ हा ५० आणि हा ६० रुपायाला"
त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी परत प्रश्न केला 
"दोन्ही तर सारखेच दिसताहेत फरक काय ?" 
" भाऊ पानोळ्या,वजन सारखेच आहे फरक फक्त बांधण्यात असतो.दोरी गच्च कमी अधीक होते भाऊ म्हणून" 
मी दोनही फडे हातात घेवून बघत होतो.अगदी दोनही बाजूने.
त्या मायमाऊलीचे हृदय खालीवर होत होते.एखाद्याने मोठ्या श्रमाने हताला घाव सहन करुन एखादी सुंदर कलाकृती बनवावी आणि माझ्या सारख्याने क्षणात तिच्या उनीवा काढुन नावे ठेवून निघून जावे काय वाटत असेल त्या पोटासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या जीवाला. 
रस्त्यावर संपूर्ण अंधार झालेला आहे. आणि तिला एवढा माल खपवून घरी जायचेय.फक्त दोनच फडे उरलेले आहेत.आणि ते ही मी बघत आहे. 
" भाऊ दहाविस कमी द्या,एवढे काय पहायले" 
"अहो ताई मी किंमत कमी करनार नाही " 
त्या रखुमाईला वाटले, मी किंमत करनार नाही म्हणजे आता मी निघून जातो का काय की.शेवटचा उरला सुरला माल असल्याने कदाचित मी घेनार नाही असा तिचा समज. 
परत ती म्हण…

जीवन विचार - 153

 
Image
🔵🔵परनिंदा व विद्येचा अभिमान माणसाला भगवंतापासून दूर नेतात🔵🔵
⭕परनिंदा करण्यासारखे पाप नाही. निंदेची सवय फार वाईट असते; तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते.⭕
🔘दुसर्‍याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो, पण ती ऐकायला तो हजरच कुठे असतो❓म्हणजे मग आपण यात काय साधले❓निंदेमुळे आपलेच मन दूषित होते. दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते.🔘
🌟ज्याला परनिंदा गोड वाटते, त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे.🌟
💮तिखट तिखटाप्रमाणे लागू लागणे ही जशी सापाचे विष उतरल्याची खूण आहे, त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला असे समजावे. म्हणून, ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वाहावी.💮
🏵भगवंताच्या मार्गाने जाणार्‍याने, दुसर्‍याच्या ठिकाणी दिसणार्‍या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे, आणि अवगुणाचे तण आपल्या अंतःकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे.🏵
 ♦पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताचा आड येतात हे देखील कळते, पण त्याला आपला इलाज नसतो. उदाहरणार…

चिंतन करण्याचे फायदे !

 
Image
🌼🌼✍🏻📖 *!!••चिं•त•न••!!* 📖✍🏻🌼🌼
मनुष्याच्या जीवनात केव्हातरी असा प्रसंग येतो की तो अतिशय हतबल होतो अशा या कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो अनेक व्रते,उपवास करतो पण देव त्याला लवकर मदत करत नाही.परंतु एक घटना मात्र निश्चित घडते आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी रहाते आणि संकटात आपली इतकी मदत करते की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो.आपण नंतर म्हणतो सुध्दा की त्यांनी अगदी देवासारखी मदत केली येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व ईश्र्वराच्या मर्जीनुसार घडते आणि ती मदत सुध्दा ईश्र्वर करत असतो मदत करणाऱ्या व्यक्तीला बुध्दीयोग देण्याचे कार्य सुध्दा ईश्र्वराचे आहे पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते व आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरतो असे घडू नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटे बसावे आणि आपल्या कठीण प्रसंगी मदत केलेल्या व्यक्तींची आठवण करावी *त्या व्यक्ती ला विसरू नये कारण देव स्वतः भेटू शकत नाही मदत करू शकत नाही म्हणून अश्या व्यक्ती ला पाठवतो* आणि मनोमन देवाचे आभार मानावे आणि एक निश्चय करावा की आपणही अशीच को…

नऊ संख्या आणि नवरात्र अध्यात्मिक संबंध आणि महत्त्व

 
Image
आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
संब नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी ‘नऊ’ धान्यं
साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी.
🔶 दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार :शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री.
🔶 दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं :अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका.
🌺 महाराष्ट्रातली देवीमातेची प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं :वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबेजोगाई), श्री एकवीरादेवी (कार्ला).
🌺 नवरात्रींचे ‘नऊ’ रंग :लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा.
🌺 नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा :रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश.
🌺 नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं :माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य,पीतवर्ण-मणी.
🌺 ‘नऊ’ प्रकारची दानं :अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श…

मी पणाचा पराभाव :- एक किस्सा स्वामी समर्थांचा

 
Image
स्वामी समर्थ
 बाबा सबनीस एक प्रकांड विद्वान कीर्तनकार होते. राम मंदिरात त्यांचे कीर्तन होते. सर्व लोकं मंत्र-मुग्ध होऊन कीर्तन ऐकतात.
 तिथे हरीबाई नावाची एक बाई येते आणी मंदिराच्या पायरीवर किर्तना कडे पाठ करुन रामाचे नामस्मरण करत बसते.  कीर्तन संपल्यावर हरी बाईला बाबा सबनीस विचारतात-" तुम्हाला काय आम्ह्चे कीर्तन ऐकावे असे नाही वाटत का?" हरी बाई थोड्या फटकल पणे बोलते-"या मोठ्या-मोठ्या गोष्टी मला समझत नाही.कानातून मनात पोहचत नाही. " "आम्हाला आमचे स्वामींच्या साध्या-सरळ गोष्टी आवडतात."   तितक्यात नारायण शास्त्री येउन बाबा सबनीसला म्हणतात: " तुम्ही या मुर्ख बाईशी काय वाद घालत आहा?' " या सर्वाना त्या भोंदू स्वामीनी वेड लावले आहे." मग शास्त्री बाबा सबनीसला म्हणातात की हनुमान जयंतीला स्वामी राम मंदिरात येणार आहे, तिथे तुम्ही आपल्या विद्वत्तेनी शास्त्रात त्यांचा पराभव करा.हनुमान जयंतीच्या दिवशी स्वामी मंदिरात येतात.बाबा सबनीस त्यांना तत्व-ज्ञानाचे प्रश्न विचारतात. स्वामी म्हणातात: "अरे ह्या गोष्टी आम्हाला काय माहित! आम्ह…
Follow

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

✍कामाची लाज वाटणारा तरूण

कविता